हत्या करून पोलीस ठाण्यात घेऊन गेला मृतदेह 

1421

अमेरिकेत राहणाऱ्या एका हिंदुस्थानी वंशाच्या व्यक्तीला पोलिसांनी चार जणांच्या हत्ये प्रकरणी अटक केली आहे. शंकर नागप्पा हांगुड असे अटक केलेल्या इसमाचे नाव आहे. हा इसम आपल्या गुन्ह्याची कबुली देण्यासाठी आपल्या सोबत पोलीस ठाण्यात मृतदेह घेऊन गेला होता. यामुळे पोलीस ठाण्यात एकच खळबळ माजली होती.

रॉबर्ट गिब्सन या पोलीस अधिकाऱ्याने स्थानिक वर्तमानपत्रांना दिलेल्या माहितीनुसार, शंकर याने आपल्याच कुटुंबातील चार जणांची हत्या केली. हत्या करून त्यातील एक मृतदेह तो सोमवारी दुपारी पोलीस ठाण्यात घेऊन गेला. पोलीस ठाण्यात पोहोचून त्याने आपण चार जणांची हत्या केली असल्याची कबुली पोलिसांना दिली. मात्र पोलिसांना त्याच्या बोलण्यावर विश्वास बसला नाही. यानंतर तो जी कार घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचला होता, पोलिसांनी त्याची तपासणी केली असता त्यांना त्यात एका व्यक्तीचा मृतदेह आढळला. यानंतर पोलिसांनी त्याच्या घराची तपासणी केली असता पोलिसांना आणखीन तीन मृतदेह आढळले. ज्यातील एक मृतदेह हा एका प्रौढ व्यक्तीचा तर दोन मृतदेह हे लहान मुलांचे होते.

दरम्यान, पोलिसांनी शंकर याला अटक केली आहे. त्याने आपला गुन्हा काबुल केला असून, त्याने या हत्या का केल्या? हे अद्याप कळू शकलेले नाही. पोलीस याबाबत अधिक तपस करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या