
देशातील आघाडीच्या रिअल लाईफ मनोरंजन चॅनल असलेल्या डिस्कव्हरीने युएन इंडिया आणि डब्ल्यूडब्ल्यूएफ इंडियासोबतच्या भागीदारीमध्ये आज #StopTheMelt ह्या आपल्या अतिशय अभिनव अशा अभियानाच्या शुभारंभाची घोषणा केली. या वर्षीच्या युएन जागतिक पर्यावरण दिनाची थीम पर्यावरणीय व्यवस्थेचे पुनरुज्जीवन ही आहे अणि त्यासंदर्भात डिस्कव्हरी इंडियाचे उद्दिष्ट पृथ्वीच्या दयनीय स्थितीवर प्रकाश टाकणे, हे आहे. इतकी मोठी समस्या ही फक्त नाट्यमय कृतीद्वारेच अधोरेखित करता येऊ शकते आणि म्हणून ह्या जागतिक पर्यावरण दिवशी, पहिल्यांदाच डिस्कव्हरी इंडिया आपल्या लोगोमध्ये बदल करून जागतिक तापमानवाढीच्या परिणामांच्या आकलनाला चालना देईल आणि लोकांना अधिक चांगल्या भवितव्यासाठी आजच कृती करण्यासाठी प्रोत्साहन देईल.
जागरूकता वाढवण्यासाठी आणि वृक्षारोपण, प्लास्टीकचा वापर टाळणे अशा सोप्या पण महत्त्वाचा परिणाम घडवून आणणा-या कृतींचे आवाहन करून प्रत्येकामध्ये आशा जागवण्यासाठी युएन इंडिया आणि डब्ल्यूडब्ल्यूएफ इंडियासोबत भागीदारीमध्ये एक विशेष विचार प्रवर्तक फिल्म प्रसारित केली जाईल. अभियानाची ही फिल्म #StopTheMelt बघण्यसाठी, इथे क्लिक करा: https://youtu.be/ip1af5XRCR0
जागतिक तापमानवाढीचे गंभीर परिणाम दर्शवणा-या आणि सर्व व्यक्तींन धोक्याचा इशारा देणारे प्रश्न विचारणा-या डिस्कव्हरी नेटवर्कच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील रोचक क्रिएटिव्हजचे ह्या अभियानाला पाठबळ मिळाले आहे. समाजातील प्रभावशाली व्यक्तिमत्वे जसे मनोज बाजपेयी, दिया मिर्झा, प्रतिक गांधी, नीरज पांडे (चित्रपट निर्माते), सानिया मिर्झा आणि पर्यावरण विशेषज्ञ इव्हान कार्टर, निजेल मार्वन व इतर अनेक जण पर्यावरणाला वाचवण्याच्या व आपल्या सवयींबद्दल नव्याने विचारमंथन करणा-या ह्या उद्दिष्टामध्ये सहभाग देण्यासाठी पुढे आले आहेत.
या अभियानाबद्दल बोलताना, साउथ- एशिया डिस्कव्हरी इन्कच्या मॅनेजिंग डायरेक्टर मेघा टाटा, ह्यांनी म्हंटले, “पर्यवरणावर होणा-या मानवी परिणामाला कमी करण्याच्या गरजेबद्दल जागरूकता वाढवण्याची आमची कटिबद्धता आम्ही पुढे नेत आहोत. युएन इंडीया आणि डब्ल्यूडब्ल्यूएफ इंडिया या दोन अतिशय सशक्त व पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने सातत्याने कार्यरत असलेल्या दळांसोबत भागीदारी करताना आम्हांला आनंद होत आहे. रिअल लाईफ मनोरंजन क्षेत्रातील नेतृत्व म्हणून नेहमीसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या मुद्द्यांकडे लक्ष आकर्षित करणे आणि अधिक चांगल्या भविष्याच्या दिशेने कार्यरत राहणे, ही आमचीसुद्धा जवाबदारी आहे.”
“2020 हे समस्येच्या आघाताचे वर्ष होते- जागतिक महामारीने जगाच्या सर्व भागांमध्ये हाहाकार उडवून दिला आणि पर्यावरणाचे संकट तर सतत गंभीर होत जाते आहे. ह्या वर्षी, आपण पर्यावरणीय पुनरुज्जीवनाच्या युएन दशकामध्ये प्रवेश केला असताना अधिक जास्त वृक्षारोपण, आपल्या आहारामध्ये सुधारणा, प्लास्टीकला बंदी आणि त्याचा पुनर्वापर, कमी वापर व रिसायकलिंग अशा सामुहिक कृतीद्वारे आपण वातावरण बदलाप्रती आपल्या कटिबद्धतेला सातत्याने पुढे नेत राहणे अनिवार्य आहे. डिस्कव्हरी नेटवर्क आणि डब्ल्यूडब्ल्यूएफसोबतच्या आमच्या भागीदारीच्या #StopTheMelt ह्या नवीन अभियानामध्ये हे आवाहन करण्यात येत आहे. आपल्यापैकी प्रत्येक जण- सरकार, स्वयंसेवी संस्था आणि समुदाय- आपण आपल्या पृथ्वीला वाचवण्यासाठी आपला वाटा उचलू शकतो,” असे रेनाटा डेसालियन, युएन रेसिडंट को- ऑर्डिनेटर, भारत ह्यांनी म्हंटले.
आपले विचार मांडताना डब्ल्यूडब्ल्यूएफ इंडियाचे जनरल सेक्रेटरी व सीईओ रवी सिंह ह्यांनी म्हंटले, “आत्ताच एकत्र येऊन काम करून आपण वातावरण बदल व निसर्गाचा ऱ्हास या दुहेरी धोक्याला टाळू शकतो. ह्या वर्षी जागतिक पर्यावरण दिवशी आपल्या पर्यावरणीय व्यवस्थांचे संवर्धन, संरक्षण व पुनरुज्जीवन, ह्यावर आपल्या प्रयत्नांचा भर राहणार आहे व शाश्वत भविष्यासाठीचा तो मार्ग आहे. डब्ल्यूडब्ल्यूएफ इंडीयाने निसर्गाच्या संवर्धनाचे व लोकांच्या व आपल्या पृथ्वीच्या आरोग्याला पहिले स्थान देऊन सुरक्षित भविष्याचे संदेश देणा-या डिस्कव्हरी इंडियाच्या अभियानांमध्ये नेहमीच आनंदाने सहभाग घेतला आहे.”
दर्शकांच अधिक मोठा सहभाग प्राप्त करण्यासाठी डिस्कव्हरी चॅनल जागतिक पर्यावरण दिवसासाठी विशेष प्रकारे बनवलेल्या वाईल्ड कर्नाटका, द स्टोरी ऑफ प्लास्टीक, जेरेमी वेड- मायटी गंगा, ग्रेट ग्लोबल क्लीन अप आणि इंडिया 2050 व इतर घटकांसह 5 तासांच्या रोचक व दर्जेदार कंटेंटचा एक कार्यक्रम 5 जून रोजी दुपारी 12 ते संध्याकाळी 5 ह्या वेळेत प्रसारित करेल.




























































