…दोन्ही देशातील संबंध आणि धोरणांच्या विपरीत मत; पन्नूच्या हत्येबाबतच्या अमेरिकेच्या आरोपांना हिंदुस्थानचे प्रत्युत्तर

खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू याच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी अमेरिकेने हिंदुस्थानी नागरिका विरोधात कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. निखील गुप्ता असे या हिंदुस्थानी नागरिकाचे नाव आहे. अमेरिकेच्या न्याय विभागाने हिंदुस्थानी नागरिकावर केलेले आरोप आणि खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू याच्या हत्येचा कटात केलेले आरोपांना हिंदुस्थानने प्रत्युत्तर दिले आहे.

हिंदुस्थानच्या परदेश मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी एका दहशवाद्याच्या हत्येप्रकरणी हिंदुस्थानी नागरिकावर केलेले आरोप चिंताजनक आहेत. तसेच दोन्ही देशातील संबंध आणि धेरणाच्या विपरीत असल्याचे हिंदुस्थानने म्हटले आहे. अमेरिकेच्या न्याय विभागाने म्हटले आहे की, 52 वर्षांचा हिंदुस्थानी नागरिक हिंदुस्थान सरकारचा कर्मचारी आहे. त्याने न्यूयॉर्क शहरातील नागरिकांची हत्या करण्याचा कट रचला होता, असा आरोप अमेरिकेने केला आहे. अमेरिकेने थेट दहशतवादी पन्नू याचे नाव घेतलेले नाही. मात्र, हे विधान त्याच्याशी संबधित असल्याचे समजते आहे. पन्नूही न्यूयॉर्कमध्येच राहत होता. निखील गुप्ता सुरक्षा व्यवस्था आणि गुप्तहेराचे काम करत असल्याचेही विभागाने म्हटले आहे. निखील गुप्ताने पन्नूच्या हत्येसाठी सुपारी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

आता हिंदुस्थानने प्रत्युत्तर देत, हे चिंताजनक आणि दोन्ही देशांच्या धोरणाविरोधात असल्याचे म्हटले आहे. खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू याच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी अमेरिकेने हिंदुस्थानी नागरिका विरोधात कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. निखील गुप्ता असे या हिंदुस्थानी नागरिकाचे नाव आहे. अमेरिकेतील सरकारी वकील डॅमियन विल्यम्स यांनी एक विधान जारी केले आहे. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, शिखांसाठी स्वतंत्र देशाची मागणी करणाऱ्या आणि न्यूयॉर्कमध्ये राहात असलेल्या एका हिंदुस्थानी वंशाच्या नागरिकाची हत्या करण्याचा कट रचण्यात आला आहे. यांनी एक विधान जारी केले की, प्रतिवादीने भारतातून न्यूयॉर्क शहरात प्रवास करणाऱ्या भारतीय-अमेरिकन नागरिकाच्या हत्येचा कट रचला, जो शिखांसाठी स्वतंत्र मातृभूमी तयार करण्याचा जाहीरपणे समर्थन करतो. या विधानामध्ये पन्नू याचे नाव लिहिलेले नसले तर हा उल्लेख त्याच्याच बाबतीत असल्याचे कळते आहे.

अमिरिकेच्या न्याय विभागाने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की हिंदुस्थानच्या एका अज्ञात अधिकाऱ्याने हत्येसाठी निखील गुप्ता नावाच्या व्यक्तिला सुपारी दिली होती. गुप्ता हा अंमली पदार्थ आणि हत्याराचा आंतरराष्ट्रीय तस्कर आहे.