वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा निकाल नोव्हेंबर महिन्यात, आयसीसीसमोर अडचण

आयसीसीने 2019 साली पहिल्यावहिल्या टेस्ट चॅम्पियनशिपचा बिगुल वाजवला. 2021 सालातील जून महिन्यात लॉर्डस् या क्रिकेटच्या पंढरीत कसोटीचा किंग ठरणार हेही निश्चित झाले. पण 2020 सालामध्ये कोरोनाचा फटका या प्रतिष्ठेच्या स्पर्धेला बसला.

मार्च महिन्यापासून आतापर्यंत काही क्रिकेट मालिका खेळवण्यातच आलेल्या नाहीत. अशा परिस्थितीत न झालेल्या मालिकांमुळे सहभागी देशांचे नुकसान झाले आहे. आयसीसीकडून नोव्हेंबरच्या मधल्या टप्प्यात या प्रकरणाबाबत क्रिकेट समिती व मुख्य कार्यकारी समितीच्या बैठकीद्वारे अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. याप्रसंगी आयसीसी कोणता निर्णय घेते हे पाहणे रंजक ठरणार आहे.

गुणांचे विभाजन की पूर्ण झालेल्या मालिकांचे गुण
आयसीसीच्या पदाधिकाऱयाला याबाबत विचारले असता त्यांच्याकडून सांगण्यात आले की, आयसीसी सर्व बाजूने विचार करून निर्णय घेईल. न झालेल्या मालिकांमधील गुणांचे विभाजन तसेच मार्च (2020) पर्यंत झालेल्या मालिकांमधील गुण या दोन्ही पर्यायांचा विचार करण्यात येणार आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची सध्याची गुणतालिका
1) हिंदुस्थान – 360 गुण
2) ऑस्ट्रेलिया – 296 गुण
3) इंग्लंड – 292 गुण
4) न्यूझीलंड – 180 गुण
5) पाकिस्तान – 166 गुण
6) श्रीलंका – 80
7) वेस्ट इंडीज – 40
8) दक्षिण आफ्रिका – 24
9) बांगलादेश – 0

आपली प्रतिक्रिया द्या