म्हारी छोरियां छोरो से..! ऑलिम्पिकचे तिकीट मिळवणारी फोगाट पहिली पहिलवान

728

हिंदुस्थानची स्टार महिला पहिलवान विनेश फोगाट हिने ऑलिम्पिक स्पर्धेचे तिकीट मिळवले आहे. 2020 साली जपानमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकसाठी पात्र होणारी फोगाट पहिली पहिलवान ठरली आहे.

मंगळवारी जागतिक कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये फोगाटने दमदार सुरुवात केली. पहिल्या लढतीत तिने ऑलिम्पिक पदक विजेत्या सोफिया मॅटसन हिचा 13-0 असा पराभव केला. परंतु यानंतर झालेल्या सामन्यात तिला विद्यमान चॅम्पियन जपानची मायू मकैदा हिच्याकडून 0-7 असा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे फोगाट विश्व चॅम्पियनशिपच्या रेसमधून बाहेर झाली, परंतु भाग्याची तिला साथ मिळाली आणि रेपेचेज राऊंडद्वारे तिला पदक जिंकण्याची संधी मिळाली.

53 किलो वजनी गटाच्या रेपेचेज राऊंडमध्ये पहिल्या लढतीत फोगाटने यूलिया खावलदजी हिचा एकतर्फी लढतीत 5-0 पराभव केला. त्यानतंर दुसऱ्या लढतीत फोगाटने अमेरिकेच्या सारा एन हिचा पराभव करत ऑलिम्पिकचे तिकीटही मिळवले आहे. आता कांस्यपदकासाठी बुधवारी रात्री तिचा सामना मारिया प्रेवोलाराकी हिच्याशी होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या