व्हॉटसअॅपवर आक्षेपार्ह व्हिडीओ अपलोड करणाऱ्या तरूणाला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । कोपरगाव

व्हॉटसअॅप ग्रुपवर दोन समाजात तेढ निर्माण होईल, असा व्हिडीओ अपलोड करणाऱ्या तरुणाला कोपरगाव शहर पोलिसांनी अटक केली. या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोन समाजात तेढ निर्माण होईल आणि कायदा सुव्यवस्थेला धोका निर्माण होईल, असा व्हिडीओ आकाश नानाभाऊ खडांगळे (रा.105 हनुमान नगर) याने मोबाईलवरून ‘आकाश भाऊ खंडागळे युवा मंच’ या व्हाट्सअप ग्रुपवर टाकला. या प्रकरणी इमरान कालू कच्ची (29) याने कोपरगाव शहर पोलिसांमध्ये फिर्याद दिली. याची गांभीर्याने दखल घेत गुन्हा रजिस्टर नंबर 158 / 2019 भादंवि कलम 295 (अ) प्रमाणे आकाश नानाभाऊ खंडागळे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे, अशी माहिती कोपरगाव शहर पोलिसांनी दिली आहे.