
Xiaomi चा 11 Lite 5G NE हा फोन हिंदुस्थानात लॉन्च झाला आहे. या फोनमध्ये 64 मेगापिक्सल कॅमेरा असून त्यात 5 G आहे. तसेच फोनमध्ये 8 GBचा रॅम आणि लेटेस्ट अँड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टम आहे.
Xiaomi 11 Lite 5G NE मध्ये क्वालाकॉम स्नॅपड्रॅगन 778 जी प्रोसेसर आणि 33 वॅट फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. फोनमध्ये 8 GB रॅम आणि 256 इंटर्नल स्टोरेज देण्यात आला आहे. फोनची बॅटरीची क्षमता 4,250mAh असून 33 फास्ट वॅट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे.
Xiaomi 11 Lite 5G NE ची किंमत 26 हजार 999 इतकी आहे. त्यात ग्राहकांना 6 GB रॅम आणि 128 GB इंटर्नल स्टोरेज असणार आहे. तर 8 GB रॅम आणि 128 GB इंटर्नल मेमरी असलेल्या फोनची किंमत 28 हजार 999 इतकी आहे. 2 ऑक्टोबर पासून हा फोन ऍमेझॉनवर विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.





























































