
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पारितोषिक दरवर्षी दिले जाते. पारितोषिक महाराष्ट्रातील व्यक्ती किंवा संस्थेला देण्यात येते. 2022 वर्षासाठी हे पारितोषिक कृषी-औद्योगिक समाजरचना व्यवस्थापन, प्रशासन, सामाजिक एकात्मता, विज्ञान-तंत्रज्ञान, ग्रामीण विकास, मराठी साहित्य व संस्कृती या क्षेत्रात महाराष्ट्रामध्ये भरीव आणि पथदर्शी कार्य करणाऱया व्यक्ती किंवा संस्थेला देण्यात येतील. रोख रक्कम 2 लाख रुपये व मानपत्र असे त्याचे स्वरूप आहे. या पारितोषिकासाठी सुयोग्य संस्था व व्यक्तींची नावे विहित पद्धतीनुसार सुचवण्यासाठी व पारितोषिक नियमावलीसाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, जनरल जगन्नाथराव भोसले मार्ग, नरिमन पॉइंट, मुंबई-21 या पत्त्यावर पाठवावीत किंवा www.chavancentre.org या वेबसाइटवर अपलोड करावीत. पारितोषिकासाठी नावे पाठवण्याची अखेरची तारीख 30 सप्टेंबर आहे.


























































