
सामना ऑनलाईन । नई दिल्ली
जम्मू-कश्मीरमध्ये दहशतवादी तसेच फुटीरतावाद्यांना पैसा पुरवल्याप्रकरणी जेकेएलएफचा प्रमुख यासीन मलिक याला बुधवारी राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) अटक केली.
अटकेनंतर यासीन मलिकला येथील विशेष न्यायमूर्ती राकेश स्याल यांच्या कोर्टात हजर करण्यात आले. एनआयएच्या खास न्यायालयात चौकशी केल्यानंतर मलिकला मंगळवारी सायंकाळी राजधानी दिल्लीत आणले गेले. दिल्ली कोर्टाने यासीनला 22 एप्रिलपर्यंत एनआयएच्या कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. जम्मू-कश्मीर पोलिसांनी फेब्रुवारी महिन्यातही यासीन मलिकला ताब्यात घेतले होते.
























































