
प्रसाद नायगावकर, यवतमाळ
गुरुवारी रात्री वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालयात अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. एमबीबीएसच्या प्रथम वर्षातील विद्यार्थिनीने गळफास लावून आत्महत्या केली आहे. सुहानी ढोले असं या विद्यार्थिनीचे नाव आहे. तिचे मूळगाव धाराशिव आहे. यामुळे संपूर्ण वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.
सुहानी ही एमबीबीएस अभ्यासक्रमाला प्रवेश मिळाल्यानंतर वैद्यकीय महाविद्यालय परिसरात असलेल्या वसतिगृहात राहत होती. सुहानीचा व न आल्याने तिच्या आईने गुरुवारी रात्री तिच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रतिसाद मिळत नसल्याने तिच्या एका मैत्रीणीच्या मोबाईलवर फोन करून सुहानी सोबत संपर्क होत नसल्याचे सांगितले. त्यामुळे मैत्रीणीने तिच्या खोलीबाहेरून आवाज देऊन बघितला. आतून काहीही प्रतिसाद मिळत नसल्याने खिडकीतून आत बघितले असता, गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती विद्यार्थिनीने प्राध्यापकांना दिली. घटनेची माहिती यवतमाळ शहर पोलिसांना मिळताच अधिकारी आणि पोलिसांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. रूमचा दरवाजा तोडून त्यांनी आत मध्ये प्रवेश केला. त्यांनी घटनास्थळी पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. पोलिसांनी घटनास्थळी एक चिठ्ठी मिळाली असून, त्यात माझ्या आत्महत्येला कुणालाही जबाबदार धरण्यात येऊ नये, असा उल्लेख असल्याचे समजते. याप्रकरणी यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सुहानी अत्यंत हुशार मनमिळाऊ पण अबोल होती. दोनच दिवसांपूर्वी ती आपल्या मैत्रिणीसोबत शॉपिंगला सुद्धा गेली होती. येत्या एक जानेवारीपासून प्रथम वर्षाची टर्म परीक्षा होती. यामुळे सर्व प्रथम वर्षांच्या सर्व विद्यार्थ्यांनी कॉमन बंक घेतला होता. याचमुळे सुहानीच्या रूम पार्टनर या गावाला गेल्या होत्या. सुहानी तिच्या खोलीत एकटीच होती. सुहानीच्या मैत्रिणीच्या अनुसार तिने अभ्यासाचे आणि परीक्षेचे फार जास्त टेन्शन घेतले होते. नेमके सर्व विद्यार्थीनि परीक्षेच्या अभ्यासात असल्याने काळ तिच्या रूममध्ये कोणीही गेले नाही. सुहानीच्या आईचा फोन आल्याने तिच्या मैत्रिणी गेल्या असता हा धक्कादायक प्रकार त्यांना आढळून आला. यामुळे सर्व विद्यार्थिनी हादरून गेल्या आहेत.
अभ्यासाच्या चिंतेने सुहानीने आपले जीवन संपविले की अजून कोणते कारण आहे हे पोलीस तपासात उघड होईलच. विद्यार्थ्यांच्या वाढणाऱ्या आत्महत्या ही महाविद्यालयासाठी ही चिंतेची बाब ठरली आहे. नियम’ नसल्यामुळे महाविद्यालयांमध्ये समुपदेशनाची सुविधा नाही मात्र, काही अपवाद वगळता बहुतेक महाविद्यालयांमध्ये अजूनही समुपदेशनाची सुविधा नाही. अभ्यास, स्पर्धा, नातेसंबंधांमधील तणाव अशा अनेक कारणांमुळे विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या प्रमाणात वाढ झाली असल्याचे निरीक्षण तज्ज्ञांकडून नोंदवले जात आहे. पण इतक्या हुशार विद्यार्थी अथवा विद्यार्थीने आत्महत्या केल्याने त्यांच्या आई वडिलांवर आणि कुटुंबावर काय आघात होतात हे त्या विद्यार्थ्याने समजून घेणे जरुरी आहे.



























































