यवतमाळच्या उपचार केंद्रातून 20 कोरोना पेशंट पळाले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

यवतमाळ जिल्ह्यातील कोरोना उपचार केंद्रातून कोरोनाचे 20 रुग्ण पळून गेल्याची धक्कादायक घटना शनिवारी उघडकीस आली आहे. घाटंजी तालुक्यात एका वसतिगृहात तयार करण्यात आलेल्या कोरोना उपचार केंद्रातून हे रुग्ण पसार झाल्याचे स्थानिक आरोग्य अधिकारी डॉ. संजय पुरम यांनी म्हटले आहे.

आरोग्य कर्मचाऱ्यांनी केलेल्या तक्रारीनुसार घाटंजी पोलिसांनी या 20 रुग्णांविरोधात एफआयआर दाखल केला आहे. आमदी गावात शुक्रवारी कोविड तपासणी शिबीर उभारण्यात आले होते. त्यात 19 गावकरी कोरोना पॉझिटिव्ह आढळले. त्यांच्यासह अन्य एक रुग्णासह सर्वांना घाटंजीच्या उपचार केंद्रात दाखल करण्यात आले होते. हे सर्व 20 रुग्ण शनिवारी सकाळी आठच्या सुमारास पळून गेले. यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी या घटनेबद्दल चिंता व्यक्त केली आहे.