येमेनमध्ये मशिदीवर क्षेपणास्त्र हल्ला, 83 जवान ठार

1300

येमेन येथील मरीब येथील एका मशिदीवर क्षेपणास्त्र आणि ड्रोनने हल्ला करण्यात आला आहे. त्यात लष्कराच्या 83 जवानांचा मृत्यू झाला आहे. लष्कराचे जवान नमाज अदा करत असताना हा हल्ला झाला आहे. हूती बंडखोरांनी हा हल्ला केल्याचा संशय व्यक्त होत आहे. मात्र हूती बंडखोरांनी अद्याप हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.

या हल्ल्यात सुमारे 150 लोक जखमी झाले आहेत. हूती बंडखोरांना इराणचा पाठिंबा आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हूती बंडखोरांनी सना शहरापासून 170 किलोमीटर पूर्वेस मरीब येथे संध्याकाळी नमाजच्या वेळी हा हल्ला केला. हल्ल्याच्या आदल्या दिवशी सरकारी सैन्याने सनाच्या उत्तरेस नाहम प्रदेशात हूती बंडखोरांविरूद्ध एक मोठी कारवाई सुरू केली होती. येमेनचे अध्यक्ष अबेदरब्बो मन्सूर हाडी यांनी या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या