सीबीएसई अभ्यासक्रमात आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स, योगाचा समावेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) आगामी शैक्षणिक वर्षापासून शालेय अभ्यासक्रमात आर्टिफिशियल इंटेलिजन्स, अर्ली चाईल्डहूड केअर आणि योगा या विषयांचा समावेश केला आहे. सीबीएसई मंडळाच्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

2019-20 शैक्षणिक वर्षापासून सीबीएसच्या नववी इयत्तेत पर्यायी विषय म्हणून आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा विषय शिकवला जाणार आहे. शाळांनी विद्यार्थ्यांना प्रेरीत करण्यासाठी आठवी इयत्तेत 12 तास आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे शिक्षण द्यायचे आहे. सीनियर सेकंडरी स्तरावर योगा आणि अर्ली चाईल्डहूड केअक हे विषय शिकवले जाणार आहेत. योगा शिक्षकांची वाढती गरज लक्षात घेऊन हे विषय सुरू केले आहेत, असे अधिकाऱयांनी सांगितले.