राममंदिर, तिहेरी तलाकविरोधी कायद्यासाठी झटणाऱ्या रविशंकर प्रसाद यांना विजयी करा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
yogi-happy

सामना ऑनलाईन । पाटणा

कायदेमंत्रीपदी काम करताना राममंदिर उभारणी आणि मुस्लिम महिलांना मोठा दिलासा देणाऱ्या तिहेरी तलाक कायद्यासाठी झटणारे केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांना मोठय़ा मताधिक्याने विजयी करा, असे आवाहन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पाटणा येथील भाजपच्या प्रचारसभेत बुधवारी रात्री मतदारांना केले. प्रसाद हे या एनडीएच्या दोन प्रमुख लक्ष्यांचे पैरोकार (वकील) आहेत, असा गौरवास्पद उल्लेखही योगी यांनी सभेत केला. बिहारच्या पाटणा साहिब लोकसभा मतदारसंघात प्रसाद यांचा सामना माजी भाजप नेते आणि आता काँग्रेसवासी झालेले शॉटगन शत्रुघ्न सिन्हा यांच्यात आहे. त्यामुळे या सुपरफाइटकडे समस्त देशाचे लक्ष लागले आहे.