तुमच्याकडे 50 खोके, आलिशान गाड्या राजन विचारेंकडे शिवसेनाप्रमुखांचे विचार, दिघेंचे संस्कार

मेरा बाप गद्दार है.. हा डायलॉग मिंधे गटाला चांगलाच झोंबल्यानंतर राज्यसभा खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी ‘दिवार’ चित्रपटातील दुसऱ्या डायलॉगची आठवण ठाणेकरांना करून दिली. तुमच्याकडे 50 खोके, आलिशान गाड्या, हेलिकॉप्टर आहेत, तर निष्ठावंत राजन विचारेंकडे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे विचार आणि आनंद दिघंचे संस्कार असल्याचे सांगत चतुर्वेदी यांनी या निवडणुकीत गद्दार गटाला धडा शिकवा असे आवाहन केले. शिवसेना इंडिया आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचारार्थ ठाणे शहरातील इंदिरानगर नाका येथे निष्ठावंतांची जाहीर सभा पार पडली. या सभेत प्रियांका चतुर्वेदी यांनी शिंदे गटाला पुन्हा इशारा दिला.

गद्दारी करून सत्ता काबीज करणाऱ्या शिंदे गटाची एकाधिकारशाही संपुष्टात आणलीच पाहिजे असे आवाहन यावेळी सर्वपक्षीय नेत्यांनी केले. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार राजन विचारेंच्या तिसरा टप्प्यातील प्रचाराला सुरुवात झाली आहे. सोमवारी संध्याकाळी इंदिरानगर येथील चौकात आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजप हटवा, लोकशाही वाचवा.. असा नारा दिला. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सरचिटणीस मनोज शिंदे, राष्ट्रवादीचे सुहास देसाई, समाजसेवक आलम बाबा, काँग्रेसचे विक्रांत चव्हाण, प्रवक्ते अॅड. राजकुमार मिश्रा, शिवसेना प्रवक्ते आनंद दुबे यांनी जनतेशी संवाद साधला व सर्वांना मार्गदर्शन केले.

गद्दारांना गद्दार नाहीतर काय महात्मा बोलायचे?
गद्दारांना गद्दार म्हटले की त्यांना खूप राग येतो असे मला समजले. अहो.. पण गद्दारांना गद्दार नाही तर काय महात्मा बोलायचे का? असा टोला शिवसेनेचे प्रवक्ते आनंद दुबे यांनी लगावला. हिंदी भाषिक समाज किंवा उत्तर भारतीय जनता एकवेळ बंडखोरी करतील, पण कधीच गद्दारी करणार नसल्याचे यावेळी दुबे यांनी निष्ठावंतांच्या सभेत सांगितले.