कर्ज फेडू न शकल्याने तरुणाची आत्महत्या

325
suicide

कर्जाच्या ओझ्याखाली गदबलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र संपता सपत नसल्याचेच उघड झाले आहे. संपूर्ण देशभरात अनेक भागातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा आकडा वाढत चालला आहे. पंजाबच्या बरनाला जिह्यातील भोतना गावच्या एका तरुणाने पणजोबांच्या काळापासून असलेले कर्ज फेडण्यात अपयश आल्याने आत्महत्या केल्याची घटना घडली.

लवप्रीत सिंह (22) असे या तुरणाचे नाव आहे. विशेष म्हणजे यापुर्वी त्याचे पणजोबा, आजोबा, आजोबांचे भाऊ आणि वडीलांनीही कर्जामुळेच आत्महत्या केली असून आता चौथ्या पिढीतील लवप्रीतनेही आयुष्य संपवले. त्यामुळे या घराण्याची संपुर्ण वंशावळच संपली आहे. 50 वर्षांपुर्वी सिंह कुटूंबाकडे 13 एकर जमीन होती. पण, आता त्यातील एक एकर जमीनही शिल्लक राहीलेली नाही. लवप्रीतच्या पश्चात त्याची आजी, आई आणि बहिण असा परिवार आहे.
कर्ज वाढत गेले, जमीन घटत गेली

कर्ज वाढत गेल्याने या घराण्याला जमीन विकावी लागली, लवप्रीतचे पणजोबा जोगिंदर यांनी एका सावकाराकडून कर्ज घेतले होते. 40 वर्षांपुर्वी त्यांनी कर्ज फेडू न शकल्याने आत्महत्या केली होती. त्यानंतर आजोपा भगवान सिंह यांनीही 25 वर्षांपुर्वी आत्महत्या केली. कर्ज वाढत गेले आणि जमीन घटत गेली असे या गावचे सरपंच बुथ सिंह यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या