आनंद पोटात  माझ्या माईना…नोकरी मिळताच तरुणीने भररस्त्यात केला डान्स

कोरोनाच्या महामारीमुळे जगभरात लाखो लोकांनी नोकऱया गमावल्या आहेत. अशातच नवीन नोकरी मिळवणे हे खरोखरच कठीण काम झाले आहे. नोकरी मिळाल्याने भारावलेल्या एका तरुणीने भररस्त्यात डान्स करत आपला आनंद व्यक्त केला आहे. या तरुणीचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय.

ज्या कंपनीत तिला नोकरी मिळाली त्याच कंपनीच्या बॉसने या तरुणीचा व्हिडीओ शेअर केला आहे. पार्किंग एरियामध्ये तिने केलेला डान्स सीसी टीव्हीमध्ये कैद झाला आहे. आपला हा डान्स रेकॉर्ड होतोय याची त्या तरुणीला जराही कल्पना नव्हती. इन्स्टाग्रावर हा व्हिडीओ शेअर करत बॉसने म्हटलेय, ‘आताच मी या तरुणीला नोकरी दिली आणि ही तिची रिऍक्शन आहे.’ त्यावर ‘खरोखरच हा आनंदाचा क्षण आहे, सध्या नोकरी मिळवणे कठीण टास्क आहे,’ अशा प्रतिक्रिया युजर्सने दिल्या आहेत.