रस्त्यावर गाडी लावण्याच्या वादातून तरुणाला मारहाण

रस्त्यालगत गाडी लावण्यावरून झालेल्या वादातून एका व्यक्तिने तरुणाला मारहाण केल्याचा प्रकार नाना पेठेतील ए. डी. कॅम्प चौक येथे घडला. दगड फेकून मारल्यामुळे तरुणाला गंभीर दुखापत होऊन शस्त्रक्रिया करण्याची वेळ आली होती. याप्रकरणी उमरअली शाकीर (18, रा. नाना पेठ) याने तक्रार दिली असून जुबेर मुस्ताक शेख (30, रा. नाना पेठ) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी आणि तक्रारदार एकमेकांच्या ओळखीचे आहेत. उमरअली ए. डी. कॅम्प चौक येथे रस्त्यावर कच्छी दाबेलीच्या हातगाडीजवळ मित्राची वाट पाहत थांबला होता. त्यावेळी जुबेर तेथे आला. त्याने गाडी लावण्याच्या कारणावरून उमरअली यांच्यासोबत वाद घालत त्याला मारहाण केली. यावेळी जुबेरने फेकून मारलेला दगड उमरअलीच्या पायाच्या घोट्याला लागला.

आपली प्रतिक्रिया द्या