गुप्तांगाची लांबी मोजायला गेला, केबल वायर अडकल्याने तरुण रुग्णालयात दाखल

आपल्या शरीराविषयीची उत्सुकता एका तरुणाला चांगलीच महागात पडली आहे. त्याच्या शरीरात केबल वायर अडकल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली आहे.

लंडनमध्ये ही घटना घडली आहे. लंडनमध्ये राहणाऱ्याया तरुणाला स्वतःच्या गुप्तांगाची लांबी पाहायची होती. त्यामुळे त्याने केबल वायर वापरण्याचं ठरवलं.

पण, ही वायर शरीराच्या आतच अडकली. खूप प्रयत्न करूनही ती बाहेर येईना. त्यामुळे त्याने ती खेचून काढायचा प्रयत्न केला आणि त्याला रक्तस्राव होऊ लागला. तेव्हा त्याने आपल्या पालकांना याबाबत सांगितलं.

त्याच्या पालकांनी त्वरित रुग्णालयात धाव घेतली. डॉक्टरांनी वायर काढायचा प्रयत्न केला पण ती आतच अडकली होती. अखेर डॉक्टरांना ती काढण्यासाठी थोडा चीर द्यावा लागला. अखेर त्यांनी ती वायर काढली. सुदैवाने त्याला कोणतीही अंतर्गत दुखापत झाली नव्हती.

अशा प्रकारे विक्षिप्त जिज्ञासा पूर्ण करण्याच्या भानगडीत न पडण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. या तरुणाला कोणतीही दुखापत झाली नसली तरीही अशा प्रकारची कृत्य गंभीर दुखापत देऊ शकतात, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या