ट्रॅफिक हा नवा कर… वर्षातले अडिच महिने त्यात खर्च होतात; तरुणाची पोस्ट व्हायरल

सध्या देशभरात वाहतूक कोंडीची समस्या ही दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. त्यात मुंबई, बंगळुरू सारख्या कॉस्मो शहरात तर पिक अवर्समधील ट्रॅफिक ही नोकरदारांची मोठी समस्या बनली आहे. या वाहतूक कोंडीमुळे अनेकांचे दिवसातले पाच पाच तास प्रवासात जात आहेत. याबाबत बंगळुरूमधील एका तरुणाने पोस्ट लिहली आहे.

या तरुणाने रेडईटवर लिहलेल्या पोस्टमध्ये तो म्हणतो की, मी वर्षाला 28 लाख रुपये कमावतो. त्यातील सहा लाख कर भरतो. 1 लाख 40 हजाराचा GST भरतो. या व्यतिरिक्त मला ट्रॅफिकच्या रुपाने आणखी एक कर भरावा लागतो. माझं ऑफिस घरापासून 14 किलोमीटरवर आहे. त्यासाठी अंदाजे मला 30 ते 35 मिनिटं लागली पाहिजे. मात्र प्रत्यक्षात मला रोज दीड तास जायला आणि दीड तास यायला लागतो. पूर्वी नवीन रस्त्यांसाठी टोल घेतला जायचा. आता ट्रॅफिक हा नवीन कर झाला आहे. वर्षातले अडीच महिने हे मी वाहतूक कोंडीत गाडीत बसून घालवतो, असे त्या तरुणाने म्हटले आहे.