लोकशाही असलेला आमचा देश परत हवा, विदेशातील तरुणाई उतरली रस्त्यावर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आम्हाला लोकशाही असलेला आमचा देश परत हवा, विद्यार्थ्यांचे भवितव्य घडवणारी शिक्षण व्यवस्था हवी, धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा. या मागण्या आता हिंदुस्थानातील नागरिक नव्हे तर विदेशातील हिंदुस्थानी नागरिकदेखील करू लागले आहेत.

दिल्लीत विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष लाठीमाराचा विविध देशांमधील हिंदुस्थानी समुदायाने तीव्र निषेध केला आहे. जर्मनीची राजधानी बर्लीन येथे मोठ्या संख्येने हिंदुस्थानी तरुणांनी मोदी सरकारचा तीव्र निषेध केला. यासोबतच मोदी सरकारच्या दडपशाहीचादेखील निषेध करण्यात आला. आम्ही झुरळ आहोत आणि आम्हाला त्याचा अभिमान आहे, अशी भावना या ठिकाणी गोळा झालेल्या तरुणांनी व्यक्त केली. कॅनडातील व्हॅनकुव्हर या शहरातदेखील हिंदुस्थानी तरुणांनी निदर्शने केली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Payal (@theregoespayal)