गाणी ऐकताना ब्ल्युटूथ इयरबडचा झाला स्फोट, तरुणाचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

या पूर्वी आपण मोबाईल किंवा पॉवर बँकचा स्फोट झाल्याचे वृत्त ऐकले असेल. फोनचा स्फोट झाल्याने काही जणांचा मृत्यूही झाला आहे. पण ब्ल्युटुथ इयरबडचा स्फोट झाला आहे, या स्फोटामुळे एका तरुणाचा मृत्यूही झाला आहे. राजस्थानमधील ही घटना असून मृत तरुणाचे नाव राकेश नागर असे होते.

राकेश जयपूरचा रहिवासी होता. राकेश घरी कानात ब्ल्युटूथ इयरबड घालून गाणी ऐकत होता. तेवढ्यात इयरबडचा स्फोट झाला आणि राकेशच्या कानातून रक्त येऊ लागले. राकेशला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु डॉक्टरांनी राकेशला मृत घोषित केले.

राकेशला इयरबडवरून गाणी ऐकण्याची सवय होती. तो नेहमी इयरबड्स लावून फोनवर बोलायचा. इयरबडचा स्फोट झाल्यानंतर मोठ्या आवाज झाला. राकेशचा मृत्यू कार्डियेक अरेस्टमुळे झाला असावा असा अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला आहे.