चंद्रभागेच्या पात्रात तरुण बुडाला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । पंढरपूर

चंद्रभागेच्या पात्रात स्नानासाठी गेलेला तरुण पात्रातील पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मरण पावला. गोविंद जनार्दन सुवर्णकार (27, रा. देगलूर, ता. जि. नांदेड) असे या भाविकाचे नाव आहे. उजनी धरणातील पाणी सोडल्याने चंद्रभागा दुथडी भरून वाहते आहे.

चंद्रभागेच्या पात्रातून वाळूचोरट्यांनी बेसुमार वाळूउपसा केल्याने मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्डय़ांवरून पाणी वाहत असल्याने भाविकांना खड्डय़ाचा अंदाज येत नाही. आजवर अनेक भाविकांना या खड्डय़ांमध्ये आपला जीव गमवावा लागला आहे. चोरट्या वाळूच्या उपशाला लगाम घालून भाविकांचे प्राण वाचविण्यासाठी उपाययोजना होणे गरजेचे आहे.