डीश टीव्ही बसवताना लागला शॉक, तरुण जखमी

13

सामना प्रतिनिधी, संभाजीनगर

डीश टीव्हीची डीश बसविताना हाय होल्टेज विद्युत तारेचा शॉक लागून एक जण भाजल्याची घटना पडेगाव येथे काल रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास घडली. पडेगाव येथे पृथ्वी पार्क कॉलनीत माजी सैनिक राजू श्रीखंडे यांच्या घरावर डीश टीव्हीची डीश फिट करण्यासाठी सागर रतन बोर्डे व त्याचा सहकारी दोघे जण आले होते.

डीश टीव्ही फिट करत असताना घरावरून गेलेल्या हाय व्होल्टेज विद्युत प्रवाहाने अचानक त्यांना ओढून घेतले. त्यामुळे शॉक लागून सागर खाली कोसळला त्याच वेळी दोन तारांमध्ये विद्युत प्रवाह एकत्रित झाल्याने मोठा आवाज झाला. त्यामुळे घराच्या भिंतींना तडा गेला आहे. सागर पडल्याचे पाहून दुसऱ्या सहकार्याने त्यास ओढून घेत तत्काळ मदत केली घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिक धावून गेले व सागर यास रिक्षामध्ये शासकीय घाटी रुग्णालयात दाखल केले. तो जवळपास तीस ते पस्तीस टक्के भाजला असून त्याच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या