वाकोल्यात पुतण्याकडून आत्येचा खून; गळा चिरून झाला फरार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
murder-knife

वाकोल्याच्या डवरी नगरमधील शिंदे चाळीत राहणार्‍या एका महिलेचा तिच्या पुतण्याने धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. गुन्हा केल्यानंतर आरोपी फरार झाला असून वाकोला पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

संगीता नाईक (40) असे मृत महिलेचे नाव आहे. ती शिंदे चाळीत राहत होती. तसेच तेथेच तिचा पुतण्या लव्ह (25) हादेखील राहतो. दोघांमध्ये काही घरगुती कारणावरून खटके उडायचे. आजही दोघांमध्ये वाद झाला. तेव्हा संतापाच्या भरात लव्ह याने धारदार चाकू आणून संगीता यांच्या गळा आणि पाठीवर वार केले. संगीता रक्ताच्या थारोळ्यात पडताच लव्हने तेथून पळ काढला. दरम्यान, गंभीर जखमी झालेल्या संगीता यांचा अखेर मृत्यू झाला. वाकोला पोलिसांनी याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करून लव्हचा शोध सुरू केला आहे.