
स्टंटबाजी करताना ओव्हरहेड वायरला स्पर्श झाल्याने एक तरुण गंभीर भाजल्याची घटना नेरूळ रेल्वेस्थानकाजवळ रविवारी घडली. या घटनेमुळे ओव्हरहेड वायरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने हार्बर मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत झाली. वाशी ते पनवेल अप आणि डाऊन मार्गावरील सेवा बंद झाली होती.
रविवारी सायंकाळी 4.30 वाजता सीवूड्स दारावे ते नेरूळ स्थानकादरम्यान सदर घटना घडल्याने तांत्रिक बिघाड झाला. यामुळे हार्बर आणि ट्रान्सहार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. यामुळे प्रवाशांना प्रचंड हाल झाले. जखमी तरुण कौपरखैराणे येथील रहिवासी असून त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.