
सामना प्रतिनिधी । लातूर
रेणापूर तालुक्यातील खरोळा या गावात ३८ वर्षीय तरुणाने स्वतःच्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. इस्माईल महमद शेख या तरुणाने मध्यरात्री घरातील आडाला गळफास घेतला. मयताचा चुलत भाऊ महेबुब महमद शेख यांच्या फिर्यादीवरुन रेणापूर पोलिसांत घटनेची नोंद घेण्यात आली आहे. खरोळा येथे या घटनेने खळबळ उडाली. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.































































