युवासेना प्रमुख, शिवसेना नेते- पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार युवासेनेचे ‘झंझावात’ हे राज्यव्यापी पदाधिकारी अधिवेशन तूर्तास स्थगित करण्यात आले आहे. नाशिक येथे 8 आणि 9 जानेवारी रोजी हे अधिवेशन आयोजित करण्यात आले होते.
सद्यस्थितीत राज्यात वाढणारा ओमायक्रोनचा प्रभाव आणि कोरोनाची वाढती रुग्ण संख्या यामुळे नागरिकांची आरोग्याची काळजी आणि राज्य शासनाच्या नियमावलीचे काटेकोरपणे पालन करून सहकार्य करण्याच्या दृष्टीने हे अधिवेशन तूर्तास स्थगित करण्यात आले आहे. युवासेनेच्या या अधिवेशनाची पुढील तारीख राज्यातील कोरोनाची परिस्थिती पाहून लवकरच जाहीर करण्यात येईल, अशी माहिती युवासेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.


























































