एक्स गर्लफ्रेंडने बिकिनीमध्ये शेअर केला फोटो, युवराजने दिली भन्नाट कमेंट

माजी क्रिकेटपटू युवराज सिंग अभिनेत्री किम शर्मा यांचे अनेक वर्ष अफेअर होते. त्या दोघांनी जाहीरपणे आपल्या प्रेमाची कबुली दिली होती. मात्र काही घरगुती अडचणीमुळे ते दोघं लग्न करू शकले नव्हते.

त्यानंतर किम शर्मा ने परदेशात स्थायिक असलेल्या एका व्यावसायिका सोबत लग्न केले तर युवराज एका अभिनेत्रीसोबत विवाह बद्दल झाला. दरम्यान किमचा तिच्या पती सोबत आता घटस्फोट झाला असून ती मुंबईत परतली आहे.


View this post on Instagram

What’s better than a day at the beach? #notmuch #flashback

A post shared by Kim Sharma (@kimsharmaofficial) on


युवराज व किम शर्मा या दोघांचे ब्रेकअप झाले असले तरी त्यांनी त्यांच्यातली मैत्री अद्याप कायम ठेवली आहे. नुकताच किमने बिकिनी मधला तिच्या गोव्याच्या ट्रीप मधील एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्या फोटोवर युवराजने भन्नाट प्रतिक्रिया दिली आहे. युवराज सिंग म्हणतो ‘गोवा अजून पूर्ववत झाले ही नाही तोपर्यंत या मॅडम त्यांचे सामान घेऊन गोव्याला पोहोचल्या… ‘

किम शर्मा ही फक्त युवराजची मैत्रीण नसून त्याची बायको हेजलची देखील मैत्रीण आहे याआधी युवराजच्या वाढदिवसाला त्यांचे एकत्र पार्टी करतानाचे फोटोज सोशल मीडियावर वायरल झाले होते. त्या फोटोतून कि म व हेजल एकमेकांसोबत कम्फर्टेबल असल्याचे दिसून आले.

लॉकडाऊन मध्ये जवळपास आठ ते नऊ महिने गोव्यातील पर्यटन बंद होते. मात्र आता टप्प्या टप्प्यानुसार देशातील लॉकडाऊन शिथील केला जात आहे. त्यामुळे गोव्यात पर्यटनाला देखील सुरुवात झाली आहे. अद्याप समुद्रकिनारी श्याकस उभे राहिले नसले तरी पर्यटक येथे येऊ लागले आहेत. किम शर्मा देखील लॉक डाऊन नंतर पहिल्याच ट्रीपसाठी गोव्यात पोचली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या