
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
वादग्रस्त मुस्लीम धर्मगुरू व दहशतवादी संघटनांना आर्थिक सहाय्य पोहोचवणारा इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनचा संस्थापक झाकीर नाईक याचे आज प्रत्यार्पण होणार असल्याची चर्चा सुरू असतानाच त्याने मात्र तो हिंदुस्थानात परतणार नसल्याचे त्याने स्पष्ट केले आहे. माझ्या प्रत्यार्पणाबाबत येणाऱ्या सर्व बातम्या खोट्या असल्याचे त्याने सांगितले आहे.
The news of my coming to India is totally baseless and false. I have no plans to come to India till I don’t feel safe from unfair prosecution. Insha Allah when I feel that the government will be just and fair, I will surely return to my homeland: Zakir Naik statement (File pic) pic.twitter.com/mrM8ApGAnv
— ANI (@ANI) July 4, 2018
We have no such information as of now. We are verifying it: Alok Mittal NIA Spokesperson on reports of Zakir Naik being brought to India today from Malaysia
— ANI (@ANI) July 4, 2018
एएनआय या वृत्तसंस्थेनं यासंदर्भात ट्विटरवरून माहिती दिली आहे. ‘मी हिंदुस्थानात परतणार असं सांगणाऱ्या सर्व बातम्या खोट्या आहेत. हिंदुस्थानात परतण्याचा काहीच प्लॅन नाही. मला हिंदुस्थानात सुरक्षित वाटत नाही, तसेच माझ्याबाबतीत निप:क्षपातीपणे खटला चालवण्याची हमी मिळत नाही. तोपर्यंत मी परतणार नाही. जेव्हा मला वाटेल की सरकार माझ्याबाबतीत योग्य न्याय करेल. तेव्हाच मी मायदेशी नक्की परतेन’, असे या ट्विटमध्ये म्हटले आहे. तसेच राष्ट्रीय तपास संस्थेचे प्रवक्ते आलोक मित्तल यांनी देखील झाकिर नाईकच्या प्रत्यार्पणाबाबत काहीच माहित नसल्याचे सांगितले आहे.
दरम्यान, मलेशिया सरकार आज झाकीर नाईकला हिंदुस्थानात पाठविणार असल्याचे वृत्त एका इंग्रजी वाहिनीने दिले होते. मात्र झाकिर नाईकने या सर्व बातम्या खोट्या असल्याचे स्पष्ट केले आहे.



























































