अभिनेते किशोर कदम झळकणार हॉरर सीरिजमध्ये

झी फाईव्हवर ‘अंधार माया’’ या पहिल्या मराठी हॉरर ओरिजनल सीरिजचा हादरवून टाकणारा थरारक ट्रेलर नुकताच चाहत्यांच्या भेटीला आला आहे. भीमराव मुडे यांनी दिग्दर्शित केलेल्या या सीरिजमध्ये राष्ट्रीय पुरस्कार विजेते अभिनेते किशोर कदम गूढ भूमिकेत दिसतील. शर्मिष्ठा राऊत आणि तेजस देसाई यांची एरिकॉन टेलिफिल्म्सअंतर्गत या सीरिजची निर्मिती करण्यात आली आहे. कथा आणि संवाद प्रल्हाद कुडतरकर यांचे असून पटकथा कपिल भोपटकर यांनी लिहिली आहे. कोकणातील खातू कुटुंबीय अंतिम विधी कार्यासाठी पूर्वजांच्या वाडय़ात एकत्र येतात. या वाडय़ात सगळे कुटुंबीय पुन्हा भेटतात, पण इथेच एका अनपेक्षित प्रवासाची सुरुवात होते. कुटुंबात पूर्वापार लपवून ठेवण्यात आलेली गुपितं नकळतपणे समोर येतात आणि बघता बघता या वाडय़ात काही विचित्र गोष्टी घडायला सुरुवात होते. आता हा वाडा खरंच पछाडलेला असतो का? की हा वाडा स्वतःचं अस्तित्व परत मिळवतोय याचा उलगडा 30 मे रोजी झी फाईव्हवर होणार आहे.