आयटीआय प्रवेश; आज सर्वसाधारण गुणवत्ता यादी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
admission

सरकारी आणि खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) प्रवेशाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी उद्या गुरुवार, 2 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता जाहीर होणार आहे. उमेदवारांना त्यांच्या प्रवेशाची स्थिती एसएमएसद्वारे कळविण्यात येणार असून या यादीबाबत काही हरकती असल्यास विद्यार्थ्यांनी 3 सप्टेंबर सायंकाळी 5 वाजेपर्यंत हेल्पलाईन क्रमांकावर साधावा, असे आवाहन व्यवसाय शिक्षण संचालनालयाने केले आहे. त्यानंतर 4 सप्टेंबरला सायंकाळी 5 वाजता अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा आयटीआय प्रवेशाला विद्यार्थ्यांचा कमी प्रतिसाद मिळाला. आयटीआय प्रवेशासाठी अर्ज करण्याची मुदत 31 ऑगस्टला संपली. आयटीआय प्रवेशासाठी राज्यातील 2 लाख 88 हजार 588 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 2 लाख 58 हजार 569 विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत.