
बेकायदेशीररित्या छुप्या पद्धतीने तंबाखुजन्य पान व गुटखा मसाल्याचा अमली पदार्थ विरोधी पथक दोनने पर्दापाश केला आहे. कोंढवा परिसरात येवलेवाडी खडी मशीन चौकात पथकाने छापा टाकून 9 लाखांचे तंबाखूजन्य पदार्थ जप्त केले. याप्रकरणी सिराज नुरआलम मनसुरी, (वय – 29, रा. कोंढवा) याला अटक करण्यात आली आहे.
अंमली पदार्थ विरोधी पथक दोन कोंढवा पोलीस ठाण्याच्या परीसरात पेट्रोलींग करीत होते. त्यावेळी येवलेवाडी ते खडी मशिन चौकात टेम्पोतुन तंबाखूजन्य पदार्थांची वाहतूक होणार असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने टेम्पो चालक सिराज नुरआलम मनसुरी याला ताब्यात घेतले. प्रतिबंधीत केलेला तंबाखुजन्य पान मसाला व गुटक्याची पोती तंबाखुजन्य पान मसाला व गुटखा, टेम्पो जप्त करण्यात आला.
चौकशीत त्याने बोपगाव, (ता. पुरंदर) मधील गोडाऊनमध्ये अणखीन तंबाखूजन्य पदार्थ असल्याची माहिती दिली. पथकाने गोडाऊनमध्ये छापा टाकून आणखीन 5 लाखांचा तंबाखुजन्य पदार्थ, पान मसाला व गुटखा जप्त केला. आरोपीकडून 14 लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, अपर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे, एसीपी नारायण शिरगावकर, अंमली पदार्थ विरोधी पथक दोनचे पोलीस निरीक्षक सुनिल थोपटे, उपनिरीक्षक दिगंबर चव्हाण, उपनिरीक्षक एस. डी. नरके, संतोष देशपांडे, प्रशांत बोमादंडी, संदिप जाधव, मयुर सुर्यवंशी, चेतन गायकवाड, शेख, शेळके, नितीन जगदाळे, योगेश मांढरे, युवराज कांबळे, दिनेश बास्टेवाड, दिशा खेवलकर यांनी केली.


























































