
सामना प्रतिनिधी । रत्नागिरी
रत्नागिरी शहरातील उद्यमनगर येथे चोरट्यांनी एका घरातून सोने व रोख रक्कम लंपास केली. या चोरट्यांनी कुलुप तोडून घरात प्रवनेश केला. त्यानंतर बेडरुममधील लोखंडी कपाट फोडून त्यातून सोने व रोख रक्कम लांबवली. बाजारात या दागिन्यांची किंमत २ लाख ६९ हजार ८०० रुपये आहे.
याप्रकरणी तसकीन मुकादम (रा. राजापुरकरिता कॉलनी उद्यमनगर )यांनी शहर पोलीस ठाण्यात चोरीची फिर्याद दिली आहे. त्यांच्या बेडरुम मधील लोखंड कपाटातील दागिने अज्ञात चोरट्याने लंपास केले.






























































