पेननंतर त्याच्या भावोजींवरही लागला अश्लीलतेचा आरोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आपल्या क्लबमधील सहकारी महिलेला अश्लील छायाचित्रे आणि संदेश पाठवणाऱया माजी ऑस्ट्रेलियन कर्णधार टीम पेनमागची साडेसाती अद्याप संपलेली नाही .आता त्याच्या भावोजींवरही म्हणजे बहिणीचा पती क्रिकेटर शॅनन टब यांच्यावरही महिलेला अश्लील संदेश पाठवल्याचा घाणेरडा आरोप करण्यात आला आहे. या ‘सेक्सटिंग’ वादामुळे क्रिकेट तस्मानियाने शॅननला बडतर्फ केले आहे. 41 वर्षीय शॅननने तस्मानियासाठी शेफील्ड शील्ड क्रिकेट स्पर्धा खेळली आहे आणि प्रशिक्षक म्हणूनही काम केले आहे.

महिला सहकाऩयाला अश्लील संदेश पाठवल्याच्या आरोपांची चौकशी सुरू झाल्यानंतर टीम पेनचा भावोजी शॅननने कोचिंग पद सोडले आहे. ही तीच महिला सहकारी आहे जिला पेनने 2017 मध्ये अश्लील संदेश पाठवले होते. क्रिकेट तस्मानियाने शॅननच्या आरोपांचीही चौकशी केली.असे हेराल्ड सनच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्याचवेळी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने पेनवरील आरोपांची चौकशीही केली. मात्र, त्यानंतर ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने पेनला क्लीन चिट दिली होती. मात्र, चार वर्षांनंतर पेनचा अश्लील संदेश व्हायरल झाल्याने त्याला कर्णधारपदाचा राजीनामा द्यावा लागला. असे हेराल्ड सनच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.