
आगीच्या दुर्घटनेत होणारी जीवित-वित्तहानी टाळण्यासाठी पालिका आपले अग्निशमन दल अद्ययावत करीत असून मिनी फायर स्टेशनची संख्या वाढवण्यात येत आहे. सद्यस्थितीत पालिकेची 35 मोठी फायर स्टेशन आहेत. तर गेल्या पाच वर्षांपासून राबवण्यात येणाऱया ‘प्रोग्रॅम ऑन एनहान्समेंट ऑफ इमर्जन्सी रिस्पॉन्स’ उपक्रमात 18 मिनी फायर स्टेशन उभारण्यात आली असून आणखी दहा मिनी फायर स्टेशन उभारण्यात येणार आहे. अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांनी ही माहिती दिली.
पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांनी पालिकेचे अग्निशमन दल देशात सर्वोत्तम असल्याचे सांगत आगामी योजनांची माहिती दिली. मुंबईत घडणाऱया आगीच्या दुर्घटनांसह सर्व प्रकारच्या दुर्घटनांमध्ये अग्निशमन दल तातडीने धावून जात बचावकार्य करीत असल्याचे त्या म्हणाल्या. मुंबईत वाढलेली बांधकामे आणि दाटीवाटीची वस्ती असल्याने बचावकार्यात अडथळे येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शहरात आग लागल्यानंतर पीक अवरमध्ये ‘रिस्पॉन्स टाइम’ 20 मिनिटे तर उपनगरात 30 मिनिटे आहे. केंद्रीय नियमावलीनुसार हा कालावधी साडेसहा ते साडेसात मिनिटे असायला हवा. मात्र मुंबईत हे आव्हान ठरत आहे. त्यामुळे ‘प्रोग्रॅम ऑन एनहान्समेंट ऑफ इमर्जन्सी रिस्पॉन्स’ (Program on enhancement of emergency response) उपक्रमात मिनी फायर स्टेशनची संख्या वाढविण्यात येत आहे. आता फायर फायटिंग सिस्टीम असलेल्या बाईक, रोबोट अशी उपकरणे आणली जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
इलेक्ट्रिक ऑडिटसाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा
मुंबईत लागणाऱया एकूण आगीच्या घटनांपैकी 80 टक्के आगी शॉर्टसर्किटमुळे लागतात. त्यामुळे इमारतींमधील अंतर्गत वायरिंग तपासणी करणे अनिवार्य बनले आहे. मात्र पालिकेकडे फक्त फायर ऑडिट करण्याचे अधिकार आहेत. त्यामुळे इलेक्ट्रिक ऑडिट करण्यासाठी नियमावली बनवणे आणि कार्यवाही करण्यासाठी राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम खात्याकडे पाठपुरावा सुरू असल्याचेही अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांनी सांगितले.
या ठिकाणी उभारणा नवा मिनी फायर स्टेशन
z गोदरेज कॅम्पस किक्रोळी
z गोराई क्हिलेज, बोरिकली पश्चिम
z सीटीआयआरसी बोरिकली पूर्क,
दहिसर क्हिलेज
z जुहू तारा रोड, सांताक्रुझ
z कुर्ला पश्चिम तकिया कॉर्ड
z हन्सराज भुगरा मार्ग, सांताक्रुझ पूर्क
z एसएफटीसी कडाळा ट्रक टर्मिनल
z लोढा फ्लोरेंझ्aाा, पश्चिम द्रुतगती मार्ग, गोरेगाक पूर्क
z शिकसृष्टी सिग्नल, क्ही.एन. पुरक मार्ग, कुर्ला पूर्क
z टिळक नगर, चेंबूर, एम-पश्चिम कॉर्ड




























































