
मंगलाबाई भागवत फाऊंडेशनच्या वतीने दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य सराव प्रश्नपत्रिका 2022 उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. इंग्रजी, मराठी आणि सेमी इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांच्या सरावासाठी प्रश्नपत्रिका आहेत. विद्यार्थी www. bhagwatfoundation.org या वेबसाईटवर जाऊन पीडीएफ स्वरूपातील प्रश्नपत्रिका डाऊनलोड करून घेऊ शकतात. या प्रश्नपत्रिकांचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सराव करावा, असे आवाहन मंगलाबाई भागवत फाऊंडेशनच्या विश्वस्त अॅड. वीणा भागवत यांनी केले आहे.






























































