
कराडच्या कृष्णा हॉस्पिटलमधून शनिवारी 24 कोरोनामुक्त झालेल्या रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. कृष्णा हॉस्पिटलमधून आत्तापर्यंत एकूण 1104 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोरोनाबाधितांची संख्या वाढत असली तरी कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचीही संख्या वाढत आहे. त्यामुळे कराड तालुक्याला दिलासा मिळाला आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर कृष्णा हॉस्पिटलमध्ये कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यास सुरुवात झाली आहे. आत्तापर्यंत अकराशेपेक्षा जास्त रुग्णांवर उपचार करून त्यांना कोरोनामुक्त करण्यात आले आहेत. कृष्णा हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. सुरेश भोसले कोरोनामुक्तीच्या लढ्याकडे लक्ष देत आहेत. शनिवारी डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांमध्ये नारायणवाडी येथील 75 वर्षीय पुरुष, कापील येथील 35 वर्षीय पुरुष, चोरे येथील 75 वर्षीय महिला, गुरुवार पेठ कराड येथील 35 वर्षीय पुरुष, मलकापूर येथील 35 वर्षीय पुरुष, 55 वर्षीय पुरुष, ओंड येथील 67 वर्षीय पुरुष, वाखाण रोड येथील 58 वर्षीय पुरुष, शिवनगर येथील 52 वर्षीय पुरुष, खुबी येथील 50 वर्षीय महिला, शुक्रवार पेठ कराड येथील 80 वर्षीय पुरुष, शनिवार पेठ कराड येथील 58 वर्षीय पुरुष, 56 वर्षीय महिला, 32 वर्षीय महिला, बुधवार पेठ कराड येथील 40 वर्षीय पुरुष, वडगाव येथील 36 वर्षीय महिला, सदाशिव कॉलनी कराड येथील 20 वर्षीय युवती, कसबा बावडा कोल्हापूर येथील 26 वर्षीय महिला, सैदापूर येथील 22 वर्षीय महिला, येळगाव येथील 26 वर्षीय पुरूष, कळंत्रेवाडी उंब्रज येथील 73 वर्षीय पुरुष, कृष्णा हॉस्पिटल येथील 29 वर्षीय पुरुष, 25 वर्षीय पुरुष, 29 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.

































































