
धार्मिक उत्सव साजरे करण्यासाठी मोठी मैदाने राज्य सरकारने आरक्षित ठेवावीत, नागरिकांना कुठलाही त्रास होणार नाही याची सरकारने जबाबदारी घ्यावी, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांनी केले.
महात्मा जोतिबा फुले यांच्या दोनशेव्या जयंतीनिमित्त आणि सत्यशोधक समाजाच्या शतकोत्तर हीरक महोत्सवी वाटचालीच्या पार्श्वभूमीवर भायखळा येथील शाहीर आण्णाभाऊ साठे नाटय़गृहात दैनिक ‘शिवनेर’च्या वतीने आयोजित सत्यशोधक महोत्सवात विद्यानंद बापट बोलत होते. ते म्हणाले, कोणत्याही धर्माच्या उत्सवांना माझा विरोध नाही, मात्र धार्मिक उत्सव हे रस्त्यावर येता कामा नये, त्यासाठी राज्य सरकारनेच पुढाकार घ्यावा. यावेळी भाजपचे मधू चव्हाण, ऍड. शंकर निकम, माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली, श्यामसुंदर महाराज सोन्नर यांनी परिसंवादात सहभाग घेतला. यावेळी नरेंद्र वाबळे, रवींद्र आवटी, उद्योजक प्रकाश चिखलीकर, किरण शेठ झोडगे, विजय तांबे, चंद्रकांत खोपडे, विजय झांजुरे उपस्थित होते.
























































