
अंबरनाथमधील काँग्रेसच्या 12 नगरसेवकांची हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. काँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रदीप पाटील यांना निलंबित केले असून संपूर्ण ब्लॉक कार्यकारणी बरखास्त करण्यात आली आहे. याबाबतचे पत्र पक्षाकडून प्रदीप पाटील यांना देण्यात आले आहे. ही कारवाई काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशावरून करण्यात आली आहे. पक्षाचे वरिष्ठ उपाध्यक्ष अॅड. गणेश पाटील यांनी दिले आहे.
या पत्रात म्हटले आहे की, आपण अंबरनाथ नगरपालिका निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढविली असून आपल्या पक्षाचे बारा सदस्य निवडून आले आहेत. मात्र, आपण प्रदेश कार्यालयास कोणतीही माहिती न देता अंबरनाथ नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाच्या सदस्यांसोबत गटबंधन केल्याचे प्रसार माध्यमांद्वारे कळाले. ही बाब अत्यंत चुकीची असून पक्षशिस्तीचा भंग करणारी आहे. ही बाब लक्षात घेता प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशावरून आपणास काँग्रेस पक्षामधून निलंबित करण्यात येत आहे. तसेच आपली ब्लॉक काँग्रेस कार्यकारिणी बरखास्त करण्यात येत आहे. त्याच प्रमाणे आपल्यासोबत पक्षशिस्तीचा भंग करणाऱ्या सर्व नगरसेवकांना सुध्दा पक्षामधून निलंबित करण्यात येत आहे.


































































