दलाल स्ट्रीटवर १४ हजार कोटींचे आयपीओ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
mumbai share market

सामना ऑनलाईन  मुंबई

लोढा डेव्हलपर्स आणि एचडीएफसी म्युचुअल फंडांसह सात कंपन्यांचे जवळजवळ १४ हजार कोटींचे ‘आयपीओ’ ऑगस्ट महिन्यात बाजारात येणार आहेत. प्रारंभिक समभाग विक्रीतून (आयपीओ) टीसीएनएस क्लोदिंग १ हजार १२५ कोटी, लोढा डेव्हलपर्स ५५०० कोटी, एचडीएफसी ऍसेट मॅनेजमेंट कंपनी ३५०० कोटी, फ्लेमिंगो २६०० कोटी, नेकांती सी फुड्स ७५० कोटी, पटेल इंफ्रा ४०० कोटी आणि जीनियस कन्सलटन्सी १७० कोटी रुपये उभे करणार आहेत.