
राज्यात 7,836 रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आजपर्यंत एकूण 14 लाख 78 हजार 496 कोरोनाबाधित बरे होऊन घरी गेले आहेत. दिवसभरात 5363 नवीन रुग्ण आढळले असून 1 लाख 31 हजार 544 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 89.39 टक्के एवढे झाले आहे.
राज्यात आज 115 करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर 2.63 टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 87 लाख 33 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 16 लाख 54 हजार 028 (19.01 टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 25 लाख 28 हजार 907 व्यक्ती होमक्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 13 हजार 237 व्यक्ती संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत.
मुंबईत दुसऱ्या दिवशीही घट; दिवसभरात 801 कोरोना रुग्ण
मुंबईत दिवसभरात 801 कोरोना रुग्ण सापडले असून गेल्या 24 तासांत एकूण 1,043 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे मुंबईत कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या आता 2 लाख 22 हजार 501 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत 23 जणांचा मृत्यू झाला.
मुंबईत 23 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांची संख्या आता 10 हजार 122 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 88 टक्क्यांवर आले आहे तर रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी 139 दिवसांवर पोहोचला आहे. मुंबईत सक्रिय रुग्णांची संख्या आता 19 हजार 290 इतकी आहे. दरम्यान, मुंबईत आतापर्यंत 14 लाख 68 हजार 481 चाचण्या झाल्या असून रुग्णांची संख्या 2 लाख 52 हजार 888 वर पोहोचली आहे.


























































