पाकव्याप्त कश्मीरमध्ये सैन्याचा आंदोलकांवर पुन्हा गोळीबार; 16 जणांचा मृत्यू, दोन दिवसांतील मृतांची संख्या 46 वर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पाकव्याप्त काश्मीरमध्ये (PoK) गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला हिंसाचार अधिकच चिघळला आहे. गुरुवारी रावळकोट येथील ईदगाह मैदानावर शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्या हजारो निशस्त्र नागरिकांवर पाकिस्तानी सैन्याने बेछूट गोळीबार केला. या गोळीबारात १६ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. याआधी दोन दिवसांपूर्वी देखील पाकिस्तानी सैन्यांनी अशा प्रकारेच केलेल्या गोळीबारात 30 आंदोलकांचा मृत्यू झाला होता, त्यानंतर ही दुसरी मोठी घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रावळकोट येथील ईदगाह मैदानावर हजारो नागरिक एकत्र जमले होते. सोमवारच्या आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना न्याय मिळावा आणि पाकिस्तान सरकारच्या दडपशाहीचा निषेध करावा यासाठी आंदोलन सुरू होते. आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. मात्र, काही वेळातच या आंदोलनाला हिंसक वळण लागले आणि पाकिस्तानी सैन्याने जमावावर थेट गोळीबार सुरू केला. यात 16 जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले आहेत.

अवघ्या ४८ तासांत एकूण ४६ आंदोलकांचा मृत्यू झाल्यामुळे संपूर्ण पाकव्याप्त काश्मीरमध्ये कमालीचा तणाव निर्माण झाला आहे. स्थानिक नागरिकांमध्ये पाकिस्तानी लष्कर आणि सरकारविरोधात तीव्र संतापाची लाट उसळली आहे