
रत्नागिरी लोकसभा मतदार संघाचे खासदार विनायक राऊत यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागासाठी नव्याने 160 बीएसएनएल मोबाईल टॉवर मंजूर झाले आहेत. त्यांची मंजूर यादी शासनाकडून जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे खासदार विनायक राऊत यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. राऊत यांनी जिल्ह्यात आजपर्यंत एकूण 348 बीएसएनएल मोबाईल टॉवर मंजूर करुन घेत सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सर्व ग्रामीण भाग नेटवर्कमध्ये जोडण्याचे काम केले आहे, अशी माहीती शिवसेनेचे सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी गटनेते नागेंद्र परब यांनी दिली.
खासदार राऊत यांनी गेल्या 7 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये पहिल्यांदा सिंधुदुर्ग जिल्ह्यात 104 बीएसएनएल टॉवर मंजूर करुन घेतले होते. त्यापैकी बऱ्याच प्रमाणात कामे पुर्ण होवून मोबाईल टॉवर सेवेत कार्यरत आहेत. 2022 मध्ये नव्याने 84 बीएसएनएल टॉवर मंजूर करुन घेतले होते. तर आता या जिल्ह्यातील ग्रामीण भागासाठी CAT 1 मधून 50 तर CAT 2 मधून 101 व 9 अतिजूने आणि नव्याने असे मिळून 160 बीएसएनएल मोबाईल टॉवर मंजूर करुन घेतले आहेत. त्यांची मंजूर यादी शासनाकडून जाहीर करण्यात आली आहे. राऊत यांनी जिल्ह्यात आजपर्यंत एकूण 348 बीएसएनएल मोबाईल टॉवर मंजूर करुन घेत सिंधुदुर्ग जिल्हयाचा सर्व ग्रामीण भाग जोडण्याचे काम केले आहे. त्यामुळे आता जिल्ह्यात बीएसएनएलचे नेटवर्क अधिक भक्कम होणार आहे, अशी माहिती नागेंद्र परब यांनी दिली.

























































