
मालाड रेल्वे स्थानकात लोकलची धडक लागून एका मुलाचा मृत्यू झाल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. जेवणाच डबा धुण्यासाठी प्लॅटफॉर्मवर उभा असताना त्या मुलाला फास्ट एसी लोकलची धडक बसली होती. मयंक शर्मा असे त्या 17 वर्षीय मुलाचे नाव होते.
अपघाताची ही हृदयद्रावक घटना 17 जून रोजी घडली होती. त्या अपघाताचा व्हिडीओ आता व्हायरल झाल्याने नागरिकांमधून हळहळ व्यक्त होत आहे. मालाड रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक तीनवरती उभा राहून मुलगा जेवणाचा डबा धुत होता. त्याच्या बाजूला जाऊन मयंकदेखील डबा धुऊ लागला. तो पाठमोरा उभा असल्याने मागून लोकल येत असल्याचे त्याच्या लक्षात आले नाही आणि इथेच घात झाला. मागून आलेल्या एसी लोकलने मयंकला जोराची धडक दिली. धडक लागल्यानंतर मयंक बाजूला फेकला गेला. रेल्वे पोलिसांनी फलाटावर निपचित पडलेल्या मयंकला लगेच शताब्दी इस्पितळात नेले, मात्र डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले





























































