
शालेय पोषण आहाराअंतर्गत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना हेल्दी आहार मिळणार आहे. तांदूळ, नाचणी, ज्वारी, बाजरी, सोयाबीनपासून बनणाऱया न्युट्रीटीव्ह स्लाईसचे विद्यार्थ्यांना आठवडय़ातून पाच दिवस वाटप करण्याच्या सूचना प्राथमिक शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी दिल्या आहेत. ई-निविदा प्रक्रिया राबवून न्युट्रीटीव्ह स्लाईस बनविण्याचे कंत्राट जालना येथील दिव्या एस.आर.जे.फूड्स एलएलपी या संस्थेला देण्यात आले आहे.
तांदूळ, नाचणी, ज्वारी, बाजरी, सोयाबीन यासह लोहयुक्त गव्हाचे पीठ, पीठीसाखर, खाद्यतेल, स्किम्ड दूध आणि इतर पोषक घटक वापरून ही न्युट्रीटीव्ह स्लाईस बनविण्यात येणार असून आकर्षक पद्धतीने सीलबंद पाकिटातून जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका, शासकीय शाळांमधील विद्यार्थ्यांना त्याचे वाटप केले जाणार आहे. शाळांनी पुरवठादाराकडे मागणी केल्यानंतर दोन महिन्यांच्या आत स्लाईसचा पुरवठा होणे बंधनकारक आहे, अशा सूचना जगताप यांनी दिल्या.
याप्रमाणे होणार वाटप (प्रती विद्यार्थी मागणी, वितरणाचे प्रमाण (ग्रॅममध्ये)
न्युट्रीटीव्ह स्लाईस प्रकार पहिली ते पाचवी सहावी ते आठवी
तांदूळ 120 120
बाजरी 120 120
ज्वारी 240 240
नाचणी 120 240
सोयाबीन 120 240

































































