तब्बल 2 हजार 700 जणांना बनावट प्रमाणपत्र दिल्याचे उघड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वेबसाईट तयार करुन तब्बल 2 हजार 700 जणांना बनावट शैक्षणिक प्रमाणपत्र दिल्याचे उघडकीस आले आहे. यासाठी 15 एजंटांची नेमणूक करीत 21 ठिकाणी सेंटर सुरु केली होती. एमबीएचा विद्यार्थी असलेल्या सैय्यद इम्रान सैय्यद इब्राहीम याने हा घोटाळा केला आहे. दोन वर्षांपूर्वी पुणे पोलिसांनी शिक्षक पात्रता परिक्षा (टीईटी) घोटाळा उघडकीस आणला होता. तशाच प्रकारचा व्यापक असा हा घोटाळा असण्याची शक्यता आहे. सैय्यद इम्रान सैय्यद इब्राहीम संदीप ज्ञानदेव कांबळे, कृष्णा सोनाजी गिरी, अल्ताफ शेख, सैय्यद इम्रान सैय्यद इब्राहीम यांना अटक केली आहे. आरोपी सय्यद एमबीए झालेला आहे. त्याने यु टयुबवर पाहून हा फसवणुकीचा फंडा तयार केला आहे.

पोलीस भरती सुरु असताना अशा प्रकारे 10 वी, 12 वीचे बनावट प्रमाणपत्र दिले जात असल्याची कुणकुण लागली होती. त्यातूनच सांगली परिसरातून ही माहिती मिळाली. त्यातून दिलीप कांबळे हा एजंट हाताशी लागला. त्याच्याकडे काही प्रमाणपत्रे मिळाली. त्यावरुन ही लिंक समोर आली. आतापर्यंत चौघांना अटक करण्यात आली आहे. आणखी 15 जणांनी नावे समजली आहेत.

– अमोल झेंडे, पोलीस उपायुक्त (गुन्हे शाखा)