
1 / 6
दिया मिर्झा आणि साहिल सिंघा यांनी लग्नाच्या पाच वर्षानंतर घटस्फोट घेतला आहे. दोघांनी सामंजस्याने घटस्फोट घेतल्याचे म्हटले असले तरी साहिलचे असलेले एक्स्ट्रा मॅरिटल अफेयर साठी कारणीभूत असल्याचे समजते.
अभिनेत्री श्वेता तिवारी हिचा पहिला नवरा राजा चौधरी याने मारहाण केल्यामुळे तिने घटस्फोट घेतला होता. मात्र दुसऱ्या लग्नात अभिनव कोहली सोबतही तिला तसाच अनुभव आला. अभिनवने श्वेता व तिची मुलगी पलक हिला मारहाण केल्याच्या चर्चा बिटाऊनमध्ये रंगल्या होत्या.
प्रसिद्ध फॅशन डिझाईनर मसाबा गुप्ता हिने तिचा पती मधू मनतेनाला घटस्फोट दिला आहे. मसाबा हे लग्नाच्या तीन वर्षातच एकमेकांपासून वेगळे झाले.
अभिनेता अरुणोदय सिंग याने लग्नाच्या दोन वर्षातच पत्नी ली एल्टनला घटस्फोट दिला आहे. ली ही मूळची कॅनडाची असून तिचे गोव्यात हॉटेल आहे.




























































