फक्त 22 लाख जणांचा दुसरा डोस बाकी, फेब्रुवारीपर्यंत मुंबईचे लसीकरण पूर्ण होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
vaccine

मुंबईत 18 वर्षांवरील सर्व 92 लाख 36 हजार 500 पात्र लाभार्थ्यांचा पहिला डोस पूर्ण झाला असून केवळ 30 टक्के म्हणजेच सुमारे 22 लाख जणांचा दुसरा डोस बाकी आहे. सद्यस्थितीत पालिका, सरकार आणि खासगी अशा 460 पेंद्रांवर लसीकरण सुरू असून फेब्रुवारीपर्यंत लसीकरण पूर्ण होईल, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

मुंबईत 16 जानेवारीपासून लसीकरण सुरू झाल्यानंतर आतापर्यंत  एकूण 1 कोटी 52 लाख 41 हजार 545 डोस देण्यात आले आहेत. सद्यस्थितीत दुसरा डोस बाकी असणाऱयांचे लसीकरण वेगाने पूर्ण करण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून सोसायटय़ा, झोपडपट्टय़ा, आस्थापने, सार्वजनिक ठिकाणे अशा जागांवर विशेष लसीकरण शिबिरे आयोजित करून दुसरा डोस पूर्ण करण्यात येईल. शिवाय मुंबईबाहेरील लाभार्थ्यांनाही पहिला डोस देण्यात येईल, अशी माहितीही पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

35 मुलांवर ट्रायल यशस्वी

पालिकेच्या नायर रुग्णालयात 2 ते 18 वर्षांवरील मुलांवर लसीकरणाची ट्रायल सुरू आहे. यामध्ये 2 ते 7 वर्षे वयोगट, 8 ते 11 आणि 12 ते 18 वर्षे वयोगटासाठी 900 जणांचे टार्गेट ठेवून लसीकरण सुरू करण्यात आले आहे. यामध्ये आतापर्यंत 35 मुलांवर झालेली ट्रायल यशस्वी ठरली असून त्यांची प्रकृती उत्तम असल्याची माहिती पालिकेचे वैद्यकीय शिक्षण आणि नायरचे डीन डॉ. रमेश भारमल यांनी दिली. या लसीकरणासाठी मुले-पालकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही पालिकेच्या वतीने डॉ. भारमल यांनी केले आहे.