कल्याण, डोंबिवलीत कोम्बिंग ऑपरेशन; 25 गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या, मध्यरात्री धडाकेबाज कारवाई

कल्याण डोंबिवली पोलिसांनी शुक्रवारी मध्यरात्री अचानक कोम्बिंग ऑपरेशन राबवले. गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी सुमारे दोन तास चाललेल्या या मोहिमेत पोलिसांनी विविध ठिकाणी कोंडी करून 25 गुन्हेगारांच्या मुसक्या आवळत गुन्हे दाखल केले, तर वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवणाऱ्या 66 वाहनचालकांकडून तब्बल 79 हजार रुपयांचा दंड वसूल केला.

कल्याण, डोंबिवलीतील विविध चाळी आणि झोपडपट्ट्यांमध्ये आसरा घेतलेले तडीपार गुंड आणि वॉण्टेड आरोपींच्या मुसक्या आवळण्यासाठी ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या आदेशानुसार आणि कल्याण उपायुक्त अतुल झेंडे यांच्या नेतृत्वाखाली कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले. रात्री 11 ते मध्यरात्री 1 वाजेपर्यंत ही मोहीम राबविण्यात आली. यावेळी 25 गुन्हेगारांची धरपकड करण्यात आली. 266 वाहनांची तपासणी केली तेव्हा अनेकांनी दारू पिऊन करून तर काहींनी कागदपत्रांशिवाय गाड्या चालवल्याचे स्पष्ट झाले. या वाहनचालकांकडून 79 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. गुटखा विकणाऱ्या 26 टपरी चालकांवरही कारवाई करण्यात आली. अवैध धंदे चालवणाऱ्या नऊ जणांवर तर सार्वजनिक ठिकाणी अमली पदार्थ विक्री करणाऱ्या 14 जणांवर कडक कारवाई करण्यात आली.

दर पंधरा दिवसांनी ऑपरेशन
या मोहिमेत दोन सहाय्यक 47 वरिष्ठ पोलीस अधिकारी पोलीस आयुक्त, आणि 210 पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते कोम्बिंग ऑपरेशन्स दर पंधरा जातील अशी माहिती कल्याणचे अतुल झेंडे यांनी दिली. आणि गुन्हेगारांचे कंबरडे . अशा प्रकारची दिवसांनी केली पोलीस उपायुक्त नागरिकांच्या सुरक्षेसाठी मोडण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे ते म्हणाले.